20 वर्षीय तरुणीवर 3 तरुणांनी अत्याचार करत विष पाजून केला खून.

जळगाव(पारोळा), दि.१० मंगळवार :  टोळी ता,पारोळा येथील रहिवासी असलेली 20 वर्षीय तरुणीवर 3 तरुणांनी अत्याचार करत विष पाजून खून केल्याचा आरोप मयत तरुणीच्या नातेवाईंकांनी तसेच मामाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी पारोळ्यात खळबळ माजली असून नातेवाईं व समाजीक संघटनेने सदर घटनेची सी आय डी चौकशी ची मागणी केली आहे. तर दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.या बाबत वीस वर्षीय पिडीता ही वाय.एस.वाय. बी. एस सी चे शिक्षण पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात घेत होती. तिच्या वडीलांचे निधन झाले असून ती आपली आई दोन बहीण, दोन भाऊ यांच्यासोबत टोळी येथे राहत होती. 7 रोजी ती आपले मामा सुरेश पाटोळे यांच्या कडे पारोळा येथे दिवाळी साठी आली होती. कामानिमित्त मामा सकाळी घरा बाहेर गेले व गेल्यावर बाहेर औषधी आणण्यासाठी जाते असे सांगून गेली असता ती परत न आलीच नाही. मामाने शोध घेतला असता पारोळा पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. ही तरुणी ही बेशुद्ध अवस्थेत शहरातील लहान राम मंदिर परिसरात लाल बाग मैदानावर खेळणाऱ्या काही तरुणांना दिसली. त्यांनी तिला कुटीर रुग्णालयात दाखल केले तिच्यावर प्राथमिक उपचारासाठी धुळे येथे नेतांना गाडीत शुद्धीवर आल्यावर तिने घटना नातेवाईंकांना सांगितली. धुळे येथे आज पिडीतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पिडीताने घटना सांगत टोळी येथील शिवनंदन शालीक पवार, शिवनंदन शालीक पवार ,पप्पू अशोक पाटील,अशोक वालजी पाटील यांनी संगनमताने अपहरण करत सामूहिक अत्याचार केला असे फिर्यादी नमुद आहे. मृत पिडीताचा शविविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्याने मृत पिडीताला विष पाजल्याचे अढळून आल्याने खळबळ आज उडाली. पोलीस स्टेशन ला यात्रेचे स्वरूप 
सदर घटनेचे वृत्त जिल्ह्यात पसरल्या नंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पारोळा पोलीस स्टेशन ला भेट देऊन एकच गर्दी केल्याने परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मारहाण करणाऱ्या महिलेचे गूढ कायम -पीडित तरुणीने मृत्यू पूर्व दिलेल्या जबाणीत आपल्या मामा व आईस दिलेल्या माहितीत 3 पुरुष आरोपी सह एका महिलेचा उल्लेख केला होता परंतु तिचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसून एकूण 4 आरोपी पैकी 2  संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी एक पुरुष व एक महिला आरोपीचे गूढ मात्र कायम आहे.

Post a comment

0 Comments