परस्पर एटीएम लांबवणारा गजाआड, 24 तासांची कोठडी.

आडनावाचा फायदा उचलत एका वाहन चालाकाला तब्बल सव्वा लाखाला गंडा घातल्याचा प्रकरणात छावणी पोलिसांनी एका गुरुजीला बुधवारी दि.11 रात्री अटक केली.


औरंगाबाद : आडनावाचा फायदा उचलत एका वाहन चालाकाला तब्बल सव्वा लाखाला गंडा घातल्याचा प्रकरणात छावणी पोलिसांनी एका गुरुजीला बुधवारी दि.11 रात्री अटक केली. अलोक मधुक रराव साठे (49, रा. शांतीपुरा, छावणी) असे आरोपीचे नाव असुन त्याला शुक्रवारपर्यंत दि.13 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी यांनी गुरुवारी दि.12 दिले. 
एमआयडीसीतील एका कंपनीच्या वाहनावर चालक असलेले दिलीप फिलीप साठे (61, रा. शांतीपुरा, छावणी) यांचे वाळुज औद्योगिक वसाहतीतील एसबीआयच्या शाखेत खाते आहे. त्यात त्यांनी मुलीच्या लग्नासाठी एक लाख 19 हजार पाचशे रुपये एफडी केली होती. जुने एटीएम कार्ड खराब झाल्याने त्यांनी नवीन कार्डसाठी बँकेकडे अर्ज केला. त्यानुसार, बँकेने 5 जानेवारी 2018 मध्ये त्यांच्या घराच्या पत्त्यावर नवीन एटीएम कार्ड पोस्टाने पाठवले. 
मात्र दिलीप साठे व आरोपी अलोक साठे हे दोघे शेजारी राहत असल्याने एटीमएम कार्ड अलोक साठे याच्याकडे दिले गेले. विशेष म्हणजे भामट्याने ते स्विकारले. दरम्यान आरोपी हा शिकवणी देखील घेतो. आरोपीने शिकवणीसाठी येणार्या विद्यार्थ्याला शिकवणीसाठी कागदपत्र जमा करण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्याने ते जमा केले. त्यानंतर आरोपीने त्या कागदपत्रांवर सिम कार्ड खरेदी केले. आणि ते सिमकार्ड बँक खात्याशी संलग्न केले. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार जमा ठेव याची माहिती भामट्याला मोबाईलवरील मॅसेजव्दारे प्राप्त झाली. पुढे त्याने टप्प्याटप्प्याने साठे यांच्या खात्यातून रक्कम काढली. 
 3 सप्टेंबर रोजी साठे यांनी बँकेत जाउन एफडी मोडण्यासाठी अर्ज केला. तेव्हा त्यांच्या खात्यातील संपुर्ण रक्कम भामट्याने लांबवल्याचे समोर आले. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एन.ए. ताडेवाड यांनी बाजू मांडली.

Post a comment

0 Comments