यंदा विठ्ठलाच्या महापुजेचा मान श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात 24 तास पहारा देणारे विणेकरी यांना.

पंढरपूर, दि. २५ गुरुवार :  कार्तिकी यात्रा दरवर्षी कार्तिक शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन २०२० यावर्षी कार्तिकी यात्रा गुरूवार, दिनांक २६ नोव्हेंबर, २०२० रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता मा. उपमुख्यमंत्री महोदय महोदय, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते श्रीची शासकीय महापुजा केली जाणार आहे. मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत श्रींच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शनरांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. दि.25/11/2020 ते दि.27/11/2020 या कालावधीत श्री.विðल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात 24 तास पहारा देणारे विणेकरी यांची मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणा-या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.

        त्यानुसार श्री.विðल रूक्मिणी मंदिरात पहारा देणा-या एकूण 6 विणेक-यांपैकी पांडूरंग (ईष्वर) चिट्टीने श्री.कवडुजी नारायण भोयर वय 64 वर्षी रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा यांची दि.22/11/2020 रोजी निवड करण्यात आली आहे. श्री.कवडुजी नारायण भोयर हे मागील 9 ते 10 वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वतः व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. मागील 8 महिन्यांपासून लाॅकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.

          त्याप्रमाणे श्री.कवडुजी नारायण भोयर, वय 64 वर्शे व सौ.कुसुमबाई कवडूजी भोयर, वय 55 वर्शे या दापत्याची कार्तिकी एकादशी दिवशी पहाटे मा. उपमुख्यमंत्री महोदय, महाराश्ट्र राज्य यांचे शुभहस्ते होणा-या श्रींच्या शासकीय महापुजेसाठी निवड करण्याबाबत मंदिर समितीचे मा.सदस्य आ.रामचंद्र कदम, श्रीमती.शकुंतला नडगिरे, डाॅ.दिनेशकुमार कदम. श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, श्री.संभाजी शिंदे, आ.सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अॅड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ. श्री.भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, सौ.साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.विðल जोशी यांनी सदरचे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

Post a comment

0 Comments