गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने घेण्यात आलेला मोटरसायकलचा लिलाव तब्बल 3 लाख 65 रुपयात.गंगापूर, दि. ९ : गंगापुर पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक मच्छिद्र सुरवसे यांच्यामुळे सरकारी किमतीपेक्षा मिळाली दुप्पटीने जास्त रक्कम....

गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत बेवारस टू व्हीलर गाड्यांचा लिलाव तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आवारामध्ये करण्यात आले निलावा आधी पोलीस निरीक्षक यांनी भंगार विक्रेत्यांना महत्त्वाच्या काही सूचना दिल्या या गाड्या संपूर्ण जेसीबीच्या साह्याने स्क्राप करण्यात व चेचीस चे दोन भाग करण्यात येईल लिलावात विक्री केलेल्या गाड्या एकही रोडवर दिसता कामा नाही याची दक्षता घ्यावी तरच लीलावात भाग घ्यावा अशी सूचनाही दिली या लिलावात भाग घेण्यासाठी ४० हजार रुपये डिपॉझिट अनामत रक्कम ठेवण्यात आली होती नगर,औरंगाबाद,नाशिकसह अनेक जिल्ह्यातील भंगार विक्रेत्यांनी लिलावा लसाठी निविदा भरल्या होत्या  यात ४४ वाहनाचे लिलाव सरकारी बोली 1 लाख 40 हजार रुपये ठरवण्यात आली होती पोलीस निरीक्षक यांनी व्यापारामध्ये चुरस निर्माण करून शासनाचा फायदा करून दिला तब्बल दुपटीने रक्कम सरकारदरबारी जमा केली.
                       दरम्यान गंगापूर येथील भंगार विक्रेते अश्फाक शेख यांनी ३ लाख 65 हजार रुपयांमध्ये अंतिम तीन वार करण्यात आले तर अहमदनगर जिल्ह्यातील हनीफ शौकत शहा कुकाना यांनी  3 लाख 6100 रुपये बोली लावली होती  संपूर्ण लिलाव प्रक्रिया पोलिसांनी इनकॅमेरा घेतली.
              यावेळी पोलीस निरीक्षक मच्छिन्नद्र सुरवसे ,पीएसआय गुशिंगे व पोलीस कर्मचारी लक्ष्मण पुरी. रवी लोदवाल, गणेश खंडागळे, राहुल शेख मेजर,वाघमारे,डमाळे मुरकुटे.सिद्धार्थ सातदिवे. फिरोज शेख आदी पोलिस अंमलदार उपस्थिती होती

Post a comment

0 Comments