पुण्यात 30 कासव जप्तलोणी काळभोर,दि.२० शुक्रवार : बेकायदा 30 कासव विक्री करण्यासाठी आणल्याप्रकरणी वनविभागाने पुणे शहरातून दोघांना जेरबंद केले असून 30 कासव जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली. 

बेकायदा कासव विक्री प्रकरणी पुण्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने गणेश पेठ, पुणे येथून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून स्टार कासव प्रजातीची 20 व ब्लॅक स्पोटेड पॉंड टरटेल प्रजातीची 10 कासव जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक शरद राजगुरू, वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, फिरत्या पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान, वनपाल समीर इंगळे, अनिल राठोड, मधुकर गोडगे यांनी पार पाडली.

Post a comment

0 Comments