नांदेड जिल्हाध्यक्ष पदी रईसखान पठाण तर उपाध्यक्ष पदी उद्धव मामडे यांची निवड.

नांदेड उमरी (दि.3 नोव्हेंबर) - तालुक्यात एकनिष्ठ गोरगरीबाची एक सामाजिक कार्य म्हणून सेवा करण्यात सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले कार्यकर्ते रईसखान पठाण व उद्धव मामडे यांची अखिल भारतीय बहुजन,ओबिसी, अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्या नांदेड जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
रईसखान पठाण व उद्धव मामडे यांचे बहुजन चळवळीत बहुमोल असे योगदान आहे. 
शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नरत असतात.

 

त्याचबरोबर,भ्रष्टाचार निर्मूलनार्थ काम करीत असताना जनहितांच्या विविध मागण्यांप्रकरणी त्या प्रसंगी आक्रमकपणे कर्तव्यतत्पर कार्यकर्ते म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय बहुजन,ओबिसी, अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोशियशनचे संस्थापक अध्यक्ष सय्यद कलिम मुसा यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब सुरनर पाटील व सौ सोनालीताई हंबर्डे मराठवाडा अध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली रईसखान पठाण व उद्धव मामडे यांची जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना नुकतेच नियुक्ती पञ  एका छोट्याखानी कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आले. 
 रईसखान पठाण व उद्धव मामडे यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.यावेळी अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन अशोशीयनच्या मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब सुरनर पाटील, महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्ष सोनालीताई हंबर्डे,कोकणेसर, चंद्रकांत नागेश्वर धर्माबाद तालुका अध्यक्ष नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष रईसखान पठाण, उपाध्यक्ष उद्धव मामडे, मारोती पाटील हिवराळे उमरी तालुका अध्यक्ष,प्रविण अप्पा मठपती, पत्रकार शेख आरीफ निमटेककर आदि  कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments