काेकण रेल्वे मार्गावरील तांब्याची वायर चाेरणारे आराेपी पाेलीसांच्या ताब्यात,गाेरेगांव पाेलीसांची धडक कारवाई



रायगड दि.२ सोमवार : माणगांव तालुक्यातील गाेरेगांव पाेलीस ठाणे हद्दीत नागाव गावाजवळ मागील महीन्यात काेकण रेल्वे मार्गावरील तांब्याची वायर चाेरण्याची घटना घडली हाेती पाेलीसांची सतर्कता व शाेधमाेहीम व स्थानिक नागरीक व इन्स्पेक्टर रेल्वे सुरक्षा बल चिपळूण व त्यांची डिटेक्टिव्ह टीम  यांच्या  सहकार्यामुळे फिर्यादी टुणटुणकुमार सिंग यांच्या फिर्यादीनुसार माणगांव निजामपुर विभागातील काेस्ते, खर्डी व कुंभार्ते गांवातील एकुण सहा संशयितांना गाेरेगांव पाेलीसांनी  आज दिनांक २ नाेव्हेंबर राेजी ताब्यात घेतले व संशयितांनी पुर्ण तपासाअंती गुन्हा कबुल केला, या गुन्ह्यामध्ये सुमारे ८१०००/- किंमतीची तांब्याची तार सुमारे १३५ मीटर इतकी वायर चाेरी झाली हाेती सदर प्रकरणी गाेरेगांव पाेलीस ठाण्यात कॉ गुन्हा रजि नं ४४/२०२० भा.दं.वि कलम ३७९,४११,३४  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणातील आराेपींना माणगांव पाेलीस ठाणे येथे अटक करण्यात आली आहे व पुढील तपास पाे नि. टाेम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गाेरेगांव पाेलीस करत आहे, 
प्रतिनिधी:रिजवान मुकादम सह मराठा तेज ब्युरो गोरेगाव रायगड.

Post a comment

0 Comments