अंबाॠषी संस्थांचे महंत श्री कुष्णगिरी महाराज यांच्या हस्ते संत एकनाथच्या गाळपाचे शुभारंभ.

अंबाॠषी संस्थांचे महंत श्री कुष्णगिरी महाराज यांच्या हस्ते संत एकनाथच्या गाळपाचे शुभारंभ


पैठण, दि. ५ गुरुवार : पैठण संत एकनाथ सचिन घायाळ कारखान्याचे अग्नी प्रतिपदन सोहळा ४ नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या सावटाखाली अगदी साध्या पद्धतीने पार पडला. संत एकनाथच्या संचालक मंडळातील सभासद प्रतिनिधी दत्ताभाऊ गोर्डे, विक्रम  काका, घायाळ, संचालक रमेश पाटील क्षीरसागर, ऊस उत्पादक प्रतिनिधी रामजी पा. मोरे, ऊस तोडणी ठेकेदार प्रतिनिधी बापूराव आढाव, कामगार प्रतिनिधी सुखदेव भालेकर, बंडू दासपुते आदींनी संपत्नीक विधिवत पूजा करून सन २०२०-२१ च्या गळीत हंगामास सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने यावर्षीच्या गाळप शुभारंभाचा सोहळा पार पडला.
यावर्षीच्या हंगामासाठी कारखाण्याची गाळप क्षमता १२५० टनावरून २५०० टनापर्यंत करण्यात आली आहे. जुने बॉयलर पाडून आधुनिक पद्धतीचे जास्त क्षमतेचे बॉयलर बसवण्यात आले आहे. तसेच रोटरी स्क्रीन, डायनो ड्राइव्ह, नवीन बॉडी, सेंट्रीफुगल मशीन, कंडेन्सट पंप, नवीन रोलर,  नवीन पाईप लाईन, व इतर असंख्य आधुनिकीकरणाची ची कामे करण्यात आलेली असल्याची माहिती सचिन घायाळ यांनी दिली. 
याप्रसंगी अंबाऋषी संस्थांचे गादीपती महंत श्री कृष्णगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता उसाची मोळी टाकून यावर्षीच्या गाळपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संत एकनाथ सचिन घायाळ कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सचिन घायाळ सर तसेच संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे, व्हा.चेअरमन गोपिकीशन गोर्डे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोदभाऊ तांबे, प्रल्हाद औटे, रेखाताई कुलकर्णी, अनिल घोडके, बद्रीनारायण भुमरे ,संचालक आबासाहेब मोरे, योगेश सोलाटे, सोमनाथ जाधव, भाऊसाहेब पिसे, भाऊ लबडे,शरद सहकारी साखर कारखान्याचे सुरेश पा.दुबाले डॉ.सुरेश चौधरी,उदय पा.तवार,संजय सदावर्ते,अजय भालेकर,आप्पासाहेब गायकवड,  गणेश पवार, संजय कोरडे, अनिल रोडे, आदी सह ऊस उत्पादक शेतकरी, मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष काकासाहेब गोरे, चंद्रकांत काळे, अशोक आढाव, मच्छिंद्र शिरवत, मधुकर गव्हाणे, नाथा बोंबले, बाबासाहेब खराद, किशोर नरवडे, सुभाष आम्ले भास्कर मोरे, गणेश बोंबले, आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------

Post a comment

0 Comments