९ तारखेला ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार - खासदार रक्षा खडसे

जळगाव : रावेरमधील भाजप खासदार रक्षा खडसे  येत्या ९ तारखेला ठाकरे सरकारविरोधात  रस्त्यावर उतरणार आहेत. जळगाव  जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणास्तव रक्षा खडसे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यलयासमोर त्या मोठं आंदोलन करणार आहेत. 

भाजपचे सर्व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी, केळी उत्पादक २०१९ या वर्षातील बँकांच्या चुकांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत कोणत्याही प्रकारची आढावा बैठक घेण्यात आलेली नाही, असा दावा केला जात आहे.
महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे बोलते, परंतु महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरली, तरी राज्य शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी जळगाव भाजपतर्फे रक्षा खडसे ९ नोव्हेंबरला आंदोलन करणार आहेत.

Post a comment

0 Comments