सोशल मीडिया युजर्सनी घेतला मुकेश खन्ना यांचा क्लास, महिलांबद्दलचे वादग्रस्त विधान भोवले

मुंबई:- महाभारतातील भीष्म पितामह आणि सुपर पॉवर बेस्ड ‘शक्तिमान’मुळे घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते मुकेश खन्ना सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. सध्या मुकेश खन्ना यांच्या एका जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुकेश खन्ना ‘मीटू’वर मत व्यक्त करत आहेत. या व्हायरल व्हिडीओत मुकेश खन्नाने महिलांनी घराबाहेर निघून काम करण्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. तूर्तास या व्हिडीओमुळे मुकेश खन्ना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत.
युजर्सनी मुकेश खन्ना यांच्यावर जबरदस्त भडास काढली आहे. यात महिला युजर्सची संख्या जास्त आहे. एका महिला युजरने मुकेश खन्ना यांचा चांगलाच क्लास घेतला.

Post a comment

0 Comments