प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या घोटाळ्याची चौकशी.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती.

प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या घोटाळ्याची चौकशी.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती.

मुंबई - मुंबै बँकेच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे अध्यक्ष आहेत.

अध्यक्ष कुणीही असो, कारभार चुकीचा झाला तर चौकशी होणारच, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब पाटील यांनी दिली. बाळासाहेब पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रवीण दरेकर यांनी कसलीही चौकशी करा, आपण चौकशीला घाबरत नसल्याचे म्हटले आहे.

सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे दरेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरेकर हे मनसेत असताना मुंबै बँकेबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर दरेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या ५ वर्षांत या प्रकरणी कुठलीही चौकशी करण्यात आली नाही. 
परंतु, आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुंबै बँकेच्या कथित घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सहकार खात्याकडून जारी करण्यात आले आहेत.

'आपण कुठल्याची चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. मुंबै बँक ही सातत्याने नफ्यात आहे. तिला 'अ' वर्ग दर्जा मिळाला आहे. या बँकेवर एकटा प्रवीण दरेकर नाही. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही प्रतिनिधी आहेत. पण गेल्या काही दिवसात आम्ही सरकारच्या अनेक घोटाळ्यांबाबत बोललो. 

सरकारला पितळ उघडे पाडण्याचे काम केले. त्यामुळे सूडाचे राजकारण करत ही चौकशी करण्यात येत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Post a comment

0 Comments