संभाजीनगरचे राजकारण न करता विकास करणार, शारेक नक्शबंदीमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात केला निर्धार.औरंगाबाद : शहरात नेहमीच राजकारणाला जाती धर्माच्या समीकरणांनी बांधले जाते ,राजकीय नेते एकमेकांवर  आरोप-प्रत्यारोप करत असतात. मात्र शहराच्या विकासाबाबत कोणीच  विचार करताना  दिसत नाही. जातीयतेच्या गलिच्छ राजकारणाला मुठ माती देऊन  संभाजीनगर की औरंगाबाद ? यांचे राजकारण न करता शहराच्या विकासावर आमचा एम आय एम पक्ष भर देणार असल्याचा निर्धार   उर्दू दैनिक एशिया एक्सप्रेसचे संपादक, एम आय एम चे शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांनी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या "वार्तालाप" या कार्यक्रमात केला. शहरातील आरोग्य  व्यवस्था, शैक्षणिक वातावरण , 
शहराचा विकास व जातीयवादी राजकारणावर वार्तालापमध्ये शारेक नक्शबंदी यांनी सविस्तर विवेचन केले. 

सुरूवातीला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. प्रभू गोरे यांनी संघाची भूमिका प्रभावीपणे मांडली. ज्येष्ठ संपादक रवींद्र तहकीक यांनी शारेक नक्शबंदी यांचे स्वागत केले. 

पत्रकार , संपादक ते राजकीय वाटचालीवर बोलताना शारेक नक्शबंदी  म्हणाले की, अनेक वर्षांपासून मी पाहतोय शहराच्या विकासाबाबतचे अनेक प्रश्न  प्रलंबित पडलेले आहेत. उर्दू नामांकित दैनिकात काम करत असताना मी अनेक प्रश्नाबाबत तटस्थ भूमिका  मांडली आहे. अनेक वेळा अशा प्रश्नांना जाती धर्माच्या चष्म्यातून बघितले जाते आणि ते प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. आमच्या पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाने त्यांच्या विभागांमध्ये रस्त्याच्या, नाल्याच्या समस्या सोडविल्या आहेत. पण त्याबाबत चर्चा होत नाही, दुसऱ्याच प्रश्नांवर चर्चा होतात. 


     महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  दिलेल्या घटनेचे कायदे सगळ्यांना समान न्याय देणारे आहेत. पण लव्ह जिहाद सारख्या  कायद्यावर नेहमीच एका विशिष्ट समाजाला वेटीस धरण्याचा प्रयत्न  केला जातो. पण धर्मनिरपेक्ष लोकशाही करण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. लव्ह जिहाद कायद्यांचे  त्यांनी खंडन  केले. 

भावनिक  खेळाला लावणार लगाम

संभाजीनगर की औरंगाबाद असे शहराच्या नामांतराचा विचार न करता  विकासाचा विचार व्हायला हवा.  निवडणुका आल्या की शहराच्या संभाजीनगर नावाचा प्रश्न उभा राहतो. कोण संभाजीनगर तर कोण औरंगाबाद घेऊन रणमैदान गाजवत असतो. लोकांना भावनिक करून मतं मिळवली जातात  पण शहराच्या विकासाचे प्रश्‍न तसेच प्रलंबित पडलेले असतात. आम्ही या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काम करत असतो. आम्हाला भावनिक राजकारणात रस नाही.


एम आय एम महानगरपालिकेसाठी सर्व पर्याय खुले ठेवणार

औरंगाबाद मनपाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत.एमआयएमच्या निर्णयाने  राजकीय पक्षांची कोंडी  होणार आहे. आपली महानगरपालिका पुणे ,मुंबई , नाशिक सारखी सक्षम बनवण्यासाठी एम आय एम पूर्ण ताकतीने मैदानात उतरली आहे, असे शेवटी शारेक नक्शबंदी यांनी सांगितले.                                        आजच्या वार्तालाप कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष छबुराव ताके ,
प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी, सरचिटणीस नारायण जाधव,जान भालेराव, गणेश पवार, किशोर दहिवडे, आकाश सावंत, जगन्नाथ सुपेकर,गौतम घाटसरे, माजेद खान,निलम कांबळे,सिधि घायाळ, जमीर रजवी, अहमद अल अहमेद, आदिल खान,   तुकाराम राऊत, कवी संजय झटु, सचिन फुके, बळीराजा अंभुरे, विलास नारळे, सतीश छापेकर आदी विविध दैनिकांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments