नैसर्गिक विधीस गेलेल्या महिलेचा विनयभंग, विरोध केल्याने डोळे फोडले ; पुण्यातील धक्कादायक घटनापुणे, दि. ५ गुरुवार :  येथील जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या महिलेचा एका अज्ञात आरोपीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध केला असता त्याने तिला जबर मारहाण केली आणि या मारहाणीत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत.

शिरूर तालुक्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही ३७ वर्षाची आहे.मंगळवारी रात्रीच्या सुमारास ते घराशेजारी नैसर्गिक विधीसाठी गेली होती. यावेळी जवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या महिलेने त्याला विरोध केला असता त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तिचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत.

दरम्यान, या   घटनेने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीविरोधात विनयभंगाचा आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेवर झालेला हा जीवघेणा हल्ला कोणी आणि कशासाठी केला, याचा तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

Post a comment

0 Comments