पंकजा मुंडेंचे पदवीधर मेळाव्यात आवाहन! पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय; बोराळकरांना करा विजयी.

पंकजा मुंडेंचे पदवीधर मेळाव्यात आवाहन! पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय; बोराळकरांना करा विजयी.
'आघाडीच्या उमेदवाराचा पराभव सत्ता परिवर्तनाची नांदी ठरेल,' अशा शब्दांत सोडले टीकास्त्र.

बीड  : राज्यातील आघाडी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. आम्ही जे दिले होत तेदेखील यांनी काढून घेतले. शेतकरी, बेरोजगार तरूण, आरक्षण सारखे प्रश्न अजूनही सुटले नाहीत, त्यामुळे पदवीधरांच्या प्रश्नांना खरा न्याय मिळवून द्यायचा असेल तर शिरीष बोराळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे. दरम्यान, आघाडी सरकारच्या उमेदवाराला निवडणूकीत पराभूत करा, तीच खरी सत्ता परिवर्तनाची नांदी ठरेल, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप मित्रपक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ रामकृष्ण लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर मतदारांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

उमेदवार शिरीष बोराळकर, ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, अक्षय मुंदडा, माजी आमदार आदिनाथ नवले, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राजाभाऊ मुंडे, रमेश आडसकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, सविता गोल्हार, प्रवीण घुगे, विजयकुमार पालसिंगनकर, जि.प. सदस्य अशोक लोढा, भारत काळे आदी यावेळी उपस्थित होते. 

पंकजा म्हणाल्या की, दोन टर्म पुर्वीपर्यंत हा मतदारसंघ भाजपचा होता. २०१४ मध्येच हा मतदारसंघ भाजपला परत घ्यायचा होता. परंतू लोकनेते मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले. ते नाहीत पण त्यांचे स्वप्न पुर्ण करायची उर्मी कायम आहे. 
आमचा उमेदवार खेळाडू आणि चँपीयन आहे. लोकांना निवडून आणण्यात माझी पीएचडी आहे. येथील मतदार मुंडे साहेबांवर प्रेम करणारा आहे. 

आमचे ओठात एक आणि पोटात एक, असे काम नाही, आम्ही सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारी माणसे आहोत, बोराळकर यांच्या विजयासाठी मेहनत घेऊ,, असे त्या म्हणाल्या.

Post a comment

0 Comments