महाविकास आघाडी सरकारला जनता नापास ठरवेल, रामदास आठवलेंची टीका

मुंबई:- महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ''महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला १०० पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ ३० गुण देऊ महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार ठरवेल'', असं ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे. 
रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर वीजबिल माफी, कोरोना संकट, कंगना राणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन धारेवर धरलं आहे. ''कोरोना संकटाचा मुकाबला करताना निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई, वीजबिल माफीवरुन जनतेच्या डोळ्यांत केलेली धूळफेक, अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णव गोस्वामी प्रकरणी दिसलेली सुडबुद्धी ही राज्य सरकारला शोभणारी कामगिरी नाही", असं आठवले म्हणाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणी दिलेला निकाल राज्य सरकारला आत्मचिंतन करायला लावणारा असल्याचंही ते पुढे म्हणाले. 

Post a comment

0 Comments