चौकशीसाठी ईडीने बोलावले; सरनाईक पिता-पुत्रांची आज होणार चौकशी.

ठाणे :  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे मारले आहे. 

त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग यांनाही ईडीने ताब्यात घेऊन चौकशी केली होती. आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीने आज चौकशीसाठी बोलावले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. 
दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले. 

सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर होण्याची सूचना ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ही आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची 6 तास चौकशी केली होती. 

सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. दरम्यान, ईडीने छापे टाकण्याआधी आपल्याला कोणतीची नोटीस दिली नव्हती, अशी प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली होती. सोमवारी संध्याकाळी ते मुंबई आले होते, त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली.
‘केंदीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल, असे कुणाला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. 

सीबीआय, ईडी काही असू द्या, आम्ही सर्व कोणालाही शरण जाणार नाहीत. लढत राहू हे सरकार पुढे 25 वर्षे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. त्यांनी लक्षात घ्यावे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. 

तुम्ही कितीही नोटिसी पाठवा, कितीही धाडी दाखल करा, खोटे पुरावे द्या, पण विजय हा सत्याचाच होत असतो’ असे राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले. तपास संस्थांचा वापर करून सरकारवर दबाव आणू इच्छित आहे. 

आमदारांचा विश्वास तोडू पाहत आहे. पण, त्यांनी हे लक्षात आणावे हा शिवरायांचा आमदार आहे. आता ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुमचे सरकार येणार नाही. तुम्ही सुरुवात केली आम्हाला शेवट कसा करायचा हे चांगले माहिती आहे. 

ईडीने आमच्या आमदारांच्या खासदारांसमोर ईडीने कार्यालय थाटले तरी काही फरक पडणार नाही’ असेही राऊत म्हणाले.

Post a comment

0 Comments