बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर अखेर पुण्यात, पोलिसांसह जयपूरहून परत, ३४ दिवसांनी घर गाठणार

पुणे : गेल्या महिनाभरापासून बेपता असलेले उद्योजक गौतम पाषाणकर  पुण्यात परतले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जयपूरहून पाषाणकरांना पुण्यात आणलं. पुणे पोलिसांना काल तब्बल ३४ दिवसांनी जयपुरातील एका हॉटेलमध्ये पाषाणकर सापडले. व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ६४ वर्षीय पाषाणकर बेपत्ता झाले होते.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील जयपूर येथून त्यांना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. आता गौतम पाषाणकर घरी परतल्याने त्यांच्या बेपत्ता होण्याचे नेमके कारण समोर येण्याची चिन्हं आहेत.

Post a comment

0 Comments