सापाचे व मानवाचे जीव वाचवणारे सर्प मित्र विकासा पासून कोसो दूर - राजुभाई साबळे


       *औरंगाबाद (प्रतिनिधि)सुनिल वैद्य  मौलाना आझाद येथे संशोधन सभागृह येथे महाराष्ट्र सेना सर्प मित्र राज्य स्तरीय परिषद मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते राजूभाई साबळे हे होते तर उद्घाटक म्हणून कर्नाटकातील प्रसिद्ध सर्पतज्ञ आनंद चिट्टी हे होते. या परिषदेत राजूभाई साबळे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम सर्पमित्र  आपल्या जिवाशी खेळून सापांचे व मानवांचे प्राण वाचवीत आहेत परंतु ते विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांना शासन दरबारी कुठेही न्याय मिळत नाही याची तीव्र खंत त्यांनी व्यक्त केली सर्पमित्र कुठल्याही प्रकारचे मानधन न घेता आपले कार्य निस्वार्थ प्रामाणिकपणे करतो दरम्यान काही दुखापत अथवा शारिरिक हनी झाल्यास शासन दरबारी कोणताही प्रकारचा विमा वर्तविला जात नाही किंवा त्या सर्व मित्रांची कोठेही नोंद होत नाही राज्यातील व देशातील तळागळातील सर्व मित्रांना महाराष्ट्र सेना सर्पमित्र आघाडीच्या माध्यमातून एकत्रित करूनत्यांना न्याय देण्यासाठी कार्य करणार असल्याचे राजूभाई साबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले यावेळी उद्धघाटक असलेले प्रसिद्ध सर्पतज्ञ श्री आनंद चिट्टी यांनी आपल्या मनोगतात सापा विषयी अंधश्रद्धा व समज व गैरसमज लोकांना मध्ये कसे असतात यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे वक्ते म्हणून डी भास्कर यांनी आपल्या भाषणात सापांविषयी माहिती व सर्पमित्र सर्वांच्या मदतीला धावून जातात पण सर्पमित्रांच्या न्याय हक्कासाठी कुणीही धावून जात नाही म्हणून सर्व सर्व मित्रांना महाराष्ट्र सेना सर्पमित्र आघाडीच्या मध्यमातून संघटित करून त्यांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे प्रथम सर्व मित्रांचे संघटन होत असल्याचेही यावेळी त्यांनी व्यक्त केले व सर्व सर्व मित्रांनी महाराष्ट्र सेना सर्पमित्र आघाडीत सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.तसेच बाळ काळने,अॅड.अविनाश थिट्टे,सर्पमित्र आकाश जाधव व महाराष्ट्रातील पहिल्या सर्पमैत्रीण वनिता बोराडे यांचे सुद्धा या वेळी भाषणे झाली.*
         *या वेळी राज्य भरातून आलेल्या सर्पमित्राचा गौरव पत्र देवून त्यांना सन्मान चिन्ह देवून त्यांना गौरवानीत आले.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पक्षी तज्ञ डॉक्टर किशोर पाठक वन्यजीव अभ्यासक अमित तपासे राज्य उपाध्यक्ष अँड. अविनाश थिट्टे प्रदेश महासचिव प्रदीप इंगोले राज्य सचिव चित्रपट आघाडी  दिग्दर्शक गोरख भारसाकळे वन्यजीव रक्षक साहेबज्योती सिंग सेठी रवी शिंदे राहुल गाडेकर टी श्यामसुंदर महेंद्र भारसाकळे नितीन पगारे,दिगंबर पवार,जयनाथ बोराडे कल्पना जमधडे गणेश साळवे सुरेश कांबळे सुनील खरात आणि आम्रपाली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाची प्रस्तावना रवी शिंदे यांनी केली तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवम आर्य यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितेश जाधव यांनी केले यावेळी सुप्रसिद्ध कोरिया ग्राफर राहुल अंकुशे,  सिद्धार्थ खरात यांनी चित्रपट आघाडीत प्रवेश घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित अनर्थे जावेद पठाण, चंद्रकांत पाटील हरिभाऊ लव्हाळे,अक्षय कीर्तिकर प्रकाश भालेराव अक्षय विध्वंसे  सचिन कुलकर्णी सुरेशआदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आयोजन सर्पमित्र औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अभिलाश जाधव व शहर प्रमुख शरद दाभाडे यांनी केले होते.*

Post a comment

0 Comments