चेष्टामस्करी जीवावर बेतली! माहीममध्ये गुंडांची निर्घृण हत्या

मुंबई -मित्राबरोबर चेष्टामस्करीतून झालेल्या भांडणातून एकाची निर्घृण हत्या करण्याची घटना शनिवारी पहाटे माहीममधील वांजा वाडी येथे घडली. शाहिद उर्फ बरकत साबीर कुरेशी (वय २५, रा. बोहरी चाळ, माहीम) असे त्याचे नाव असून हल्लेखोराने डोक्यात दगड घालून व चाकूने वार करून पलायन केले. त्याचा रात्री उशीरापर्यत शोध लागलेला नव्हता.
शाहिदवर ही अनेक गुन्हे दाखल होते,असे पोलिसांनी सांगितले. शाहिद व हल्लेखोर दोघे मित्र असून एकाच परिसरात रहातात. शनिवारी पहाटे पर्यंत  वांजा वाडी येथील किंग रेफ्रिजरेशन, पटेल   बिल्डिंग येथे चेष्टा करीत बसले होते.   त्यातून  दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने   शाहिदच्या डोक्यात  दगड मारुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वतः वरील चाकूने त्याच्या पोटात  वार केले. याबाबत त्याचा भाऊ  मोहम्मद शाकिरने दिलेल्या फिर्यादीनुसार माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments