बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला अटक.


भारती आणि हर्षच्या घरात सापडला 86 ग्रॅम गांजा.


मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला अटक करण्यात आली. तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्षला अटक केली आहे. 
भारती आणि हर्षच्या घरात 86 ग्रॅम गांजा सापडला होता. त्यानंतर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला एनसीबीने ताब्यात घेतले होते. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भारतीला अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता हर्षलाही अटक करण्यात आली आहे.

या दोघांच्या अटकेनंतर आज त्यांना हॉलिडे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
काल हर्ष आणि भारतीला एनसीबीने  समन्स बजावले होते. त्यानंतर एनसीबीने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे. तर तिच्या पतीची म्हणजे हर्षची चौकशी सुरु होती. या चौकशीत ते दोघेही गांजाचे सेवन करत असल्याचे उघड झाले आहे. तब्बल 17 तास तिची चौकशी केल्यावर हर्षला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

एनसीबीने काल  खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले. यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. 
भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग हिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. तर, हर्षची चौकशी सुरू होती. त्याचप्रमाणे इतर कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. 
एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. 
गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागांत धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीने हर्ष-भारतीच्या घरावर छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

Post a comment

0 Comments