महाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.
 महाड, दि. २ सोमवार : पंढरपूर ते  महाड पासून जाणाऱ्या क्रांतीसूर्य, विश्वरत्न,  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंबडवे गावी जाणाऱ्या रस्त्याचे  दीड वर्षांपासून चोपद्री करनाचे काम सुरु आहे. व्यवस्थित असलेल्या रस्त्याची विल्हेवाट लावून प्रत्येक ठिकाणी मातीचे ढिगारे, खडी, टाकून पसरवली आहे. पावसाल्यात तर वाहनांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागला. बेबलघर, तेलंगे, कुंबले या गावाशेजारी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य तयार झाले आहे. वाहन चालक,प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. महाड शहर 20 किलोमीटर अंतरावर असून, कोणताही आजारी व्यक्ती किंवा गर्भवती महिला यांना महाड रुग्णालयात उपचाराकरिता न्यायच म्हटलं तर या खड्ड्यातुन  जाता जाता त्यांचा मृत्यू होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ठेकेदार अजून ही गाड झोप घेत असल्याचे चित्र उघड झाले आहे. कधी होणार रस्ता या चिंतेत नागरिक आहेत नागरिकांनी वारंवार पत्र व्यवहार करून देखील ठेकेदार दुर्लक्ष करतोय यावेळी रस्त्याचे काम ठेकेदाराणे केले नाही तर नागरिकांनी रस्ता रोको आंदोलनाचा जाहीर इशारा दिलाय.

Post a comment

0 Comments