जो बायडेन , कमला हॅरिस या हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात, त्यांची खुशमस्करी करू नका, मोदींना आत्मनिर्भर होण्याचा स्वकीय खासदारांचा सल्ला.


अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात आहेत. त्यामुळे भारत सरकारने अमेरिकेमध्ये सत्तेत येणाऱ्या जो बायडेन यांच्या सरकारची खुशमस्करी करु नये, असा सल्ला देताना  भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला आहे.आपल्या ट्विटमध्ये खा . स्वामी यांनी म्हटले आहे कि , प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार अमेरिकेत बायडेन-हॅरिस यांच्या सरकारला (म्हणजेच सरकारमधील नेत्यांना) भारतामध्ये आमंत्रित केलं जाणार आहे. केंद्र सरकारने दोघांचीही खुशमस्करी करु नये. भारताशी संबंधित प्रकरणांमध्ये जो बायडेन हे कमला हॅरिस यांच्या माध्यमातून येतील आणि कमला हॅरिस या वैचारिक दृष्ट्या हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात म्हणजेच भाजपाच्या विरोधात आहेत. अशावेळी पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर व्हावं.

दरम्यान  हे ट्विट करण्याआधी रविवारी आणखीन एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींनाच सल्ला दिला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (२० जानेवारी २०२१ पर्यंत ते राष्ट्राध्यक्ष असतील) यांना ट्विट करुन भारताचे चांगले मित्र झाल्याबद्दल आभार मानले पाहिजेत. तसेच त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करावे,” असं म्हटलं आहे. “मी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला संविधानानुसार असणारा मार्ग दाखवला आहे. मी एखाद्या घोड्यासाठी पाणी आणू शकतो मात्र त्याला पाणी पाजू शकत नाही,” असंही स्वामींनी म्हटलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना शुभेच्छा देताना, भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद होते. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करता येईल, असं म्हटलं होतं. या  शुभेच्छा देताना मोदींनी बायडेन यांच्याशी गळाभेट घेताना एक फोटो देखील शेअर केला होता. मोदींनी उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले. तुमचे यश प्रेरणादायक आहे. हा केवळ तुमच्या नातलगांसाठीच नव्हे, तर सर्व भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारत-अमेरिका संबंध तुमच्या नेतृत्वात आणि सहकार्याने नवीन उंची गाठतील, अशी आशा मला आहे, असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले होते.
Post a comment

0 Comments