महाविकास आघाडी सरकाराच्या कामगिरीवर लोक समाधानी.

महाविकास आघाडी सरकाराच्या कामगिरीवर लोक समाधानी.
'द स्ट्रेलेमा' या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणातूनआले समोर.

मुंबई :-  शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन पक्षांनी एकञ येत महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन केले आहे. या सरकारला नुकतीच वर्षपुर्ती साजरी केली आहे. सरकाराच्या वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमिवर 'द स्ट्रेलेमा' या संस्थेने सरकारच्या कामगिरीवर सर्व्हेक्षण केला आहे.या सर्व्हेक्षण सर्वसामान्यांना विविध मुद्द्यांवर, सरकारच्या कामगिरीवर काय वाटते याचा उलगडा केली आहे. 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान हे सर्वेक्षण मोहीम राबविली आहे. राज्यातील सर्व विभागाचा यामध्ये विचार केला आहे. 10 हजार लोकांशी संवाद साधून काही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचले आहे, असे स्ट्रेलेमा संस्थेचे अध्यक्ष सुशील शिंदे यांनी सांगितले आहे.
भविष्यातही लोकांना उद्धव ठाकरेच हवेत मुख्यमंञी : भविष्यात तुम्हाला खालीलपैकी कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल,असा प्रश्न विचारण्यात आला होता. यात सर्वाधिक पसंती मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी मिळाली आहे. तर त्यांच्या खालोखाल उपमुख्यमंञी अजित पवार यांना पसंती मिळाली आहे.तर, तीसऱ्या क्रमाकांवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत.

काय होते प्रश्न, लोकांनी कुणाली दिली पसंती बघा

1)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी कशी वाटते.
समाधानी आहे : 59
समाधानी नाही : 32
सांगता येत नाही : 9


2)भविष्यात तुम्हाला खालीलपैकी कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल.
उद्धव ठाकरे : 24
अजित पवार : 21
देवेंद्र फडणवीस : 19
बाळासाहेब थोरात : 5
सांगता येत नाही : 17
यापैकी नाही : 14


3)गेल्या वर्षभरातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीविषयी आपण समाधानी आहात का?
समाधानी आहे : 60
समाधानी नाही : 30
सांगता येत नाही : 10

Post a comment

0 Comments