येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटलं जाणार नाही- कंगना रणौत

नवी दिल्ली - कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या एका ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या 'भूत पुलिस' या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न्यूज आर्टिकल शेअर करत लिहिले आहे, "सध्या हिमाचल मुंबईच्या अनेक फिल्म यूनिट्सचे होस्टिंग करत आहे. देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणी या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला 'हरामखोर' अथवा 'नमकहराम' म्हटले जाणार नाही. जर, असे कुणी म्हणत असेल तर, मी त्याची निंदा करते, बॉलीवुड प्रमाणे गप्प बसणार नाही.
कंगना रणौत ने गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूत केसवरून मुंबई पोलिसांवर टीका केली होती. एवढेच नाही, तर तिने संजय राऊतांवर तिला मुंबईमध्ये न येण्याची धमकी देण्याचा आरोपही केला होता. तसेच मुंबईची तुलना POK सोबत केली होती. यानंतर, कंगनाच्या ट्विटवरून भडकलेल्या संजय राऊतांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी, असे म्हटले होते. या वक्तव्यावर चहू बाजूंनी राऊतांवर टिका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना हरामखोरचा अर्थ नॉटी, असा सांगितला होता. 

Post a comment

0 Comments