बीडीओ च्या आश्वासनानंतर बाभूळगाव ग्रामस्थांचे आंदोलन मागेवैजापूर (प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :

वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव बु येथील नागरिकांनी बोगस कामाचा चोकशी अहवाल मिळत नसल्याने व  ग्रामविकास अधिकारी बैठकीस हजर राहत नसल्याने व बाभूळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पेव्हर ब्लॉक झालेल्या भ्रष्टाचार बद्दल माहिती देत नसल्याने गटविकास अधिकारी वैजापूर यांना आज दिनांक 3 नोव्हेंबर ला आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते.त्यामुळे आज पंचायत समिती परिसरात ग्रामविकास अधिकारी विरुद्ध कारवाई करण्यासाठी उपोषणाला सुरुवात झाली मात्र सध्या आचारसंहिता लागू असल्याने गटविकास अधिकारी यांनी गावकऱ्याची समजूत काढत ग्रामविकास अधिकारी यास 24 तासाच्या कारणे दाखवा म्हणून नोटीस बजावली असून चोविस तासात ग्रामविकास अधिकारी पूर्णमाहिती नुसार हजर न झाल्यास कारवाई साठी सि ओ कडे अहवाल पाठविण्यात येईल असे गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिल्यामुळे बाभूळगाव गावकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी भगवान गायकवाड, दत्तू कडवे, किशोर चोपडे , दादाभाऊ जाधव व इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती

Post a comment

0 Comments