नागपुरात कृषी कायद्याविरोधात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन, तुपकरांसह कार्यकर्त्यांना अटक.

'स्वाभिमानी'चा मोर्चा,: पोलिसांनी अडवून रविकांत तुपकरांसह 20 ते 30 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात.

नागपूर : केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं होते. 
स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्ते हे आंदोलन करत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय ‘स्वाभिमानी’ने घेतला होता.
केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं होते. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्ते हे आंदोलन करत होते. 
 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय ‘स्वाभिमानी’ने घेतला स्वाभिमानीचा मोर्चा संविधान चौकातून गडकरींच्या घराच्या दिशेने निघाला होता. 
संविधान चौकात दिवाळी साजरी करुन ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते नितीन गडकरींच्या घराच्या दिशेने निघाले होते. मात्र, मोर्चाला सुरुवात होताच, पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह स्वाभिमानीच्या 20 ते 30 कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली ‘स्वाभिमानी’चे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 
यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, हे सरकार पोलिसांना समोर करत असल्याची टीका रविकांत तुपकर यांनी केली. यावेळी “सरकार हमसे डरती हैं, पुलिस को आगे करती हैं”, अशा घोषणाही देण्यात आल्या.


Post a comment

0 Comments