मेळघाटमधील धारणी बाजारपेठेला भीषण आग; दहापेक्षा अधिक दुकाने जळून भस्मसात.

आज सकाळी पहाटेच्या सुमारास बाजार पेठेला अचानक आग; लाखोंचे नुकसान.

अमरावती : जिल्ह्यातील धारणी शहरातील बाजार पेठेला आज सकाळी चार वाजताच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमुळे दहापेक्षा जास्त दुकाने आगीत जळून भस्मसात झाल्याची धक्कादायक घटना  घडली. आगीत जुळून खाक झालेल्या दुकानामध्ये चार मोठ्या कपड्यांच्या दुकानांचा समावेश असल्याने लाखोचे नुकसान या आगीमुळे झाले आहे.
आगीची माहिती मिळताच, धारणी नगरपंचायतीच्या अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. 


अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरातील एसटी बस स्टँड परिसरात असणाऱ्या बाजार पेठेतील एका हॉटेलला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. 

त्यामुळे या दुकानाच्या रांगेत असलेल्या इतरही दुकांने या आगीत पेटले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले.  या आगीत बाजारपेठेत असलेले चार मोठे कपड्याची दुकाने चप्पल दुकान, हॉटेल आदी दुकाने आगीत भस्मसात झाले. 

नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप  अस्पष्टच आहे. दिवाळीच्या हंगामात दुकानाला लागलेल्या आगीमुळे व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले.


Post a comment

0 Comments