शाळा सुरू होणार की नाही, उद्या बैठक

नाशिक : कोरोनाची लाट त्सुनामीसारखी पुन्हा येऊ शकते, त्यामुळे शाळा  सुरू करायच्या की नाही, याबाबत उद्या रविवारी बैठक होणार आहे. नाशिकमधील  शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा, याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. मात्र, शाळा सुरू करणं बंधनकारक नाही, स्थानिक प्रशासनानं कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशा सुचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

Post a comment

0 Comments