कोल्हापूरच्या इचलकरंजीत जीवघेण्या चाकूहल्ल्याचा थरार

कोल्हापूर- इचलकरंजी-कोल्हापूर रोडवर कबनूर परिसरात असणाऱ्या हॉटेल रविराज येथे विनायक हुक्कीरे या युवकावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जीवघेणा चाकूहल्ला झाला होता. या घटनेतील जखमी विनायक हुक्कीरेला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. 
बसवराज महादेव तेली उर्फ कानापत्रावर, अशोक तमन्ना तेली, सुभाष तमन्ना तेली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विनायक हुक्कीरे हे भाजपच्या नगरसेविकेचे पती आहेत. विनायकचा जिमचा व्यवसाय आहे. दरम्यान, बसवराज व सद्दाम या दोघांचा आर्थिक वाद होता तो वाद मिटवून बसवराजने सद्दामला द्यावे लागत असणारे पैसे द्यावेत यासाठी विनायकने तगादा लावल्याने बसवराजने चिडून विनायक हुक्कीरे याच्या घरावर आठवड्या भरा पूर्वी हल्ला केल्याची घटना घडली होती.

Post a comment

0 Comments