मी तुझा पती आहे", असे खोटे सांगून मनोरूग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार.


पिंपरी, दी. ५ गुरुवार : मोबाईलवरून फोन करून "मी तुझा पती आहे, तू दार उघड' असे खोटे सांगून घरात शिरलेल्या एकाने मनोरूग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार थेरगाव येथे घडला. किशोर दिनकर सूर्यवंशी (वय 30, रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे पती व आरोपी हे थेरगाव येथील एका जिममध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. दोघेही ड्युटीवर असताना फिर्यादीचे पती झोपी गेल्यानंतर आरोपीने फिर्यादीला मोबाईलवरून फोन केला."मी तुझा पती आहे, तू दार उघड' असे खोटे सांगून फिर्यादीच्या घरात शिरला. ओरडल्यास मारून टाकीन, अशी धमकी देत फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे. 

Post a comment

0 Comments