दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद.
एचएमटी परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहे. 

एचएमटी परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहे. जम्मू-कश्मीरमध्ये 2 दिवसांनंतर म्हणजेच 28 नोव्हेंबरपासून जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका होणार आहे. 

एचएमटी परिसरातील शरीफाबादमध्ये श्रीनगर-बारामूला हायवेवर एक पेट्रोलिंग पार्टीवर दहशदवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी सलग पेट्रोलिंग पार्टीवर फायरिंग केली होती. यामध्ये दोन जवान गंभीर स्वरुपात जखमी झाले होते. यानंतर जवानांनी प्राण सोडले.
पुंछमध्ये पाकिस्तानची फायरिंग : तिकडे, पाकिस्तानने पुन्हा एकदा लाइन ऑफ कंट्रोलवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पुंछ परिसरात एलओसीवर पाकिस्तान सतत फायरिंग करत आहे. 

भारतीय सैन्यही याचे उत्तर देत आहे. 4 दिवसांपूर्वीच पुंछच्या देगवार, माल्टी आणि दल्लान परिसरात पाकिस्तानने फायरिंग केली होती.