काँग्रेस आमदार भाई जगताप यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल.
मुंबई : केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन पुन्हा पेटले आहे. गुरुवारी सकाळी दिल्ली-हरयाणा सीमेवर अंबालाजवळ मोठ्या प्रमाणावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यांसाठी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचे फवारे आणि अश्रुधुरांचा वापर केला आहे. त्यामुळे, मोदी सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे.
काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी सुध्दा मोदी सरकारवर टि्वटद्वारे शाब्दिक हल्लाबोल केला आहे. निवडणूकीत मतांसाठी ज्या बळीराजाकडे पाया पडून आर्जव करता, त्याच बळीराजाच्या डोक्यात आज राजा बनून काठ्या मारता आहे का? असा थेट सावल भाई जगताप यांनी केला आहे.
0 Comments