मनसेचा डिसेंबरमध्ये मुंबईत मेळावामेळावा

मुंबई: ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आता राजकीय पक्षांनीही मरगळ झटकून कामाला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डिसेंबरमध्ये मुंबईत मेळावा घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दिवाळी नंतर राज ठाकरे काय राजकीय फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. आज नवी मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी डिसेंबरमध्ये मुंबईत मेळावे घेणार असल्याचं सांगितलं. तसेच नवी मुंबईतील या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Post a comment

0 Comments