प्रसिद्ध लॉबिस्ट नीरा राडियावर ३०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईडब्ल्यू) गुन्हा नोंदवत नयाती हेल्थकेअरसह दोन कंपन्यांविरूद्ध तपास सुरू केला आहे. नीरा राडिया  या नयाती हेल्थकेअरच्या अध्यक्ष आणि प्रवर्तक आहेत. ज्या २ जी प्रकरण आणि वादग्रस्त टेप प्रकरणामुळे चर्चेत होत्या. यामध्ये ईडब्ल्यूने दोन कंपन्यांविरोधात ३०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईओडब्ल्यूच्या एफआयआरनुसार, गुरुग्रामच्या हेल्थ कंपनीबरोबरच नारायणी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांची नावं समोर आली आहेत. या दोन्ही कंपन्यांम्धेय ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला आहे.
नयती आणि नारायणी यांच्यावर गुरुग्राम आणि विमहंस रुग्णालय या दिल्लीतील हॉस्पिटलमधील योजनांमध्ये २०१८  ते २०२० दरम्यान ३१२.५०कोटी रुपयांचा फेरफार केल्याचा आरोप आहे.
नीरा राडिया ही एक प्रसिद्ध लॉबीस्ट आहे. नीरा यांनी अवघ्या १५ वर्षांत अब्जाधीश झाल्या. फक्त २जी घोटाळ्यासह अनेक महत्त्वपूर्ण घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव आहे. यामुळे देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनाही आपण निर्दोश असल्याचा पुरावा कोर्टात सादर करावा लागला.

Post a comment

0 Comments