उमरी येथील दोन नायब तहसीलदारांच्या झाल्या बदल्या.


 नांदेड उमरी (दि.3,नोव्हेंबर) - उमरी तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदारांच्या बदल्या हे आदेश प्राप्त झाल्याने या ठिकाणी या दोघांना कार्यमुक्त केल्यानंतर याठिकाणी एकही नायक तहसीलदार राहणार नाही. 
उमरी तहसील कार्यालयात तीन नायब तहसीलदार यापैकी दोन नायब तहसीलदार हे आपले कर्तव्य बजावत होते प्राप्त झालेल्या  बदल्यांच्या आदेशात महसूल विभागाचे नायब तहसीलदार राजेश लांडगे व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार शंकर नरावाड यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाल्याने या कार्यालयात यांना कार्यमुक्त केल्यानंतर एकही नायब तहसिलदार नागरिकांसाठी उपलब्ध राहणार नसून केवळ  तालुक्याचा कार्यभार तहसीलदारांवर राहणार आहे.

 महसूल विभागाचे नायब तहसीलदार राजेश लांडगे हे जवळपास तीन वर्ष सेवा उमरी तालुका साठी दिले आहे तसेच निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार शंकर नरावाड हेसुद्धा आपली सेवा दिली आहे औरंगाबाद विभागातून आलेल्या आदेशात उमरी तहसील येथील दोन नायब तहसीलदार यांचे बदल्या प्राप्त झाले आहे.

 यात राजेश लांडगे यांची बदली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड याठिकाणी झाली तर शंकर नरावाड यांची बदली बिलोली येथील उपविभागीय कार्यालयात झाली उमरी तहसील कार्यालयात एक तहसीलदार व तीन नायब तहसीलदार असे पद असून गेल्या अनेक वर्षापासून एक किंवा दोन नायब तहसीलदार यावरच कार्यभार चालत होता आता या ठिकाणी दोन नायब तहसीलदार पैकी दोघांच्याही बदली झाल्याने याठिकाणी सर्व कामाचा बोजा एकट्या तहसीलदार यांच्यावर पडणार आहे.

Post a comment

0 Comments