खुलताबादेत फटाका विक्रीस परवानगी नसल्याने स्थानिक व्यापारी हवालदिल.

खुलताबाद : शहरासह तालुक्यात विविध गावामधील बाजारपेठा दिवाळी निमित्त सजल्या असून कोरोना महामारीच्या अनुषंगाने फटका विक्रीसाठी अद्याप प्रशासनाच्यावतीने परवानगी न मिळाल्याने छोटे मोठे फटाका व्यावसायिक हवालदिल आहे. 
कोरोना विषाणूच्या संसार्गामुळे गेल्या सात महीन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते . ऑक्टोबंर महीन्यापासून टप्याटप्याने लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरही कोवीड विषयक नियमाचे काटेकोर पणे पालन करून नागरिकांनी नागपंचमी, पोळा, ईद, दसरा आदी सन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. 

आता अवघ्या काही तासावर दिपवाळीचा सण येवून ठेपला असल्याने तालुका भरातील बाजारपेठेत फटाका दुकाने वगळता विविध प्रकारच्या साहीत्य विक्री करणारी दुकान, किराणा सामान विक्री करणारे दुकाने सजली असून, बाजार पेठेत किराणा सामान सह विविध गृह उपयोगी वस्तुची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, या मध्ये दिवाळीच्या सणासाठी लागणार्‍या पणत्या, बोळके, करदोरे, लाह्या, बात्तासा, विविध प्रकारचे आकाश कंदील, मिठाईचे बॉक्स, भेटवस्तु, इलेक्ट्रॉनिक वस्तुची दुकान, नविन कपडयाची दुकाने आदींनी बाजारपेठेत सजली असून ग्राहक चोखंदळपणे साहित्य खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे विशेष बाब म्हणजे बाजारपेठेत नविन कपडे, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल वस्तु परंतु अद्याप फटाके दुकाने बाजारपेठेत न लागल्या मुळे बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. 
या बाबत एका फटाका व्यावसायिकाला छेडले असता त्यांनी सांगितले की, दिवाळी सना निमित्त फटाके विकणारे ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना फटाके विकून मोकळे झाले आहे. परंतु किरकोळ विक्रेत्यांना बाजारपेठेत दुकान लावण्यासाठी हव्या असलेल्या परवानग्या प्रशासनाच्या वतीने अद्याप देण्यात न आल्याने आम्ही आणलेलाला माल अंगावर पडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे, या वर्षी कसे बसे कोरोना लॉक डाऊन नंतर आता व्यवसायाला सर्वात करत होतो त्यात प्रशासनाने टांगून ठेवल्याने मोठी पंचायत झाली असल्याची खंत व्यापार्‍याने व्यक्त केली आहे.
 बाजारपेठेत नविन चैत्यन आल्याने ग्राहकांनी बाजारपेठ फुलून गेली असली तरी कोवीड आजाराचा प्रार्दुभाव वाढु नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून प्रशासनाचे वतीने ग्राहक व दुकानदार यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम सुरूच आहे.

Post a comment

0 Comments