रोहित पवारांसाठी ‘मातोश्रीं’चा पुढाकार

कर्जत:-  आतापर्यंत शंभरहून अधिक बैठका आणि चौकसभा झाल्या आहेत. ज्या काही समस्या आहेत त्या रोहित यांच्या माध्यमातून दूर होतील, असा विश्वास सुनंदा पवारांनी व्यक्त केला.सध्या कर्जत आणि जामखेड शहराने स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आपल्या मुलाच्या मतदारसंघाचा प्रथम क्रमांक यावा, यासाठी स्वतः सुनंदा पवार मैदानात उतरल्या आहेत.
जामखेड आणि कर्जत शहराने केंद्र सरकारच्या स्वच्छता परीक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्वच्छता अभियानात दोन्ही शहरं तयारीला लागली आहेत, मी यात प्रबोधनाचे काम करत असल्याचं सुनंदा पवार यांनी सांगितलं.मुलगा कुठल्याही क्षेत्रात असला तरी त्याला आईची साथ असतेच. असंच उदाहरण पवार कुटुंबियातून समोर आलं आहे.
अहमदनगरमधील कर्जत शहर स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात उतरलं आहे. यात चक्क आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सहभाग नोंदवला आहे.

Post a comment

0 Comments