अवैध धंदे वाल्यांनो सावधान आता माझी बारी, अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करा - सापोनि गिरिधारी ठाकूर.  अजिंठा, दि. ९ :  अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक दिवसापासून अवैध धंदे वाल्यांना कुठलाही धाक उरलेला नव्हता अवैध धंदे करणारे राजरोसपणे रस्त्यावर आपले धंदे सुरू ठेवत होते पण नव्याने रुजू झालेले गिरीधर ठाकूर येणार असल्याचा धसका घेत अवैध धंदे वाल्यांनी आपले धंद्याचे चे ठिकाण बदलले आहे. .तरीदेखील चोरून-लपून सुरू असलेले अवैध धंदे पुरावे दैनिक सूर्योदय कडेच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाले असून नवनियुक्त  सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरिधारी ठाकूर यांना दाखवताच यांनी अवैध धंदे वाल्यांना चेतावणी देत हे धंदे तात्काळ बंद करा नसता माझ्याशी गाठ आहे.असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक दिवसापासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत अशा धंद्यावर आतापर्यंत पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली तरीदेखील हे धंदे राजरोसपणे सुरू होते आता अजिंठा पोलीस ठाणे या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नव्याने रुजू होणारी गिरीधर ठाकूर याची धास्ती घेत अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायम सुरू राहणाऱ्या धंद्याच्या ठिकाणी आज मात्र सुखसुकाट दिसत होता तरीदेखील दैनिक सूर्योदय च्या टीमने छुपे कॅमेरे वापरून नवीन जागेत मटका चालतो हा सर्व प्रकार उघड केला आहे .सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर यांना सध्या सुरू असलेल्या अवैध धंद्याची व्हिडिओ दाखवले असता त्यांनी अवैध धंदे वाल्यांना चेतावणी देत सांगितले की हे धंदे तात्काळ बंद करा मला माननीय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या भागातील धंदे बंद करण्यासाठीच पाठवले आहेत नसता माझ्याशी सामना आहे. अवैध धंदेवाल्यांना माफी नाही असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी सांगितले आता बघण्याचा विषय आहे. किती दिवस अवैध धंद्यावाले शांत बसणार त्यांना पोलिसांचा धाक आहे. किंवा नाही अवैध धंदे सुरू ठेवणार किंवा बंद करणार  हे प्रश्न  उपस्थित होत आहे.

Post a comment

0 Comments