टेम्पो पल्टी होऊन एक ठार तर आठ जण जखमी.गंगापूर, दि.६ शुक्रवार : 407 टेम्पो पलटी होऊन एक ठार तर आठजण गंभीर जखमी झाले असून जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील जामगाव येथील मजूर गंगापूर येथे रस्त्याचे काम करुन संध्याकाळी सात वाजता ४०७ टॅम्पो क्रमांक एम एच ०४ ई वाय ४३१३ मध्ये बसून घरी जात असताना चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे टॅम्पो चालवत असताना गाडीवरील ताबा सुटल्यामुळे तो बोजवारे वस्तीजवळ पल्टी झाला टेम्पोचे तोंड उलट्या दिशेला झाले होते या अपघातामध्ये कचरू शामराव आगळे ५५, यांचा जागीच मृत्यू झाला तर अकील चांद शेख,१८,अबुजर बाबु शेख १७ ,निसार बाबु शहा३५,हुसेन फतरु शेख १८, सर्जेराव अंनता घोडके ४० ,गोरख काशिनाथ साबळे ५०,रघुनाथ सोनाजी दुशींग ६०, किशोर कचरु दिवे ३० हे गंभीर जखमी झाले  या जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टर गीते चावडा यांनी त्यांच्यावर उपचार केले जखमींना औरंगाबाद येथे पाठविण्यासाठी रुग्ण कल्याण समितीचे अतुल रासकर यांनी ॲम्बुलन्स भाड्याने करून दिली यावेळी नगरसेवक प्रदीप पाटील, भाग्येश गंगवाल, वाल्मीक शिरसाट, बशीर  पटेल , राहुल वानखेडे,फैसल बासोलान , काळे संपत रोडगे आदींनी मदत केली.

Post a comment

0 Comments