अर्णब गोस्वामीसाठी स्वतः राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन तर सुटकेसाठी राम कदम यांचे सिद्धी विनायकाला साकडे.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामीसाठी स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून याबाबत चर्चा केली आहे. अर्नबच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर उतरली असून न्यायालयात अर्णबचा जामीन अर्ज प्रलंबित असतानाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना फोन केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 



अर्णबच्या अटकेवरून देशाच्या गृहमंत्र्यांनीही हि आणीबाणी आहे आणि  लोकशाहीची गळचेपी असल्याचे ट्विट केले होते. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला गेल्या  बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपलांनी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामीची सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गोस्वामी बुधवारी (४ नोव्हेंबर)पासून अटकेत आहे. 

रविवारी  त्याला कोठडीत असताना मोबाइल फोनचा वापरल्यामुळं तळोजा तुरुंगात हलवण्यात आलं आहे. त्यांच्याकडे कोठडीत असताना मोबाइल फोन आला कुठून, कोणी दिला? याची चौकशी आता करण्यात येत आहे. नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यामुळं अर्णब गोस्वामीच्या कुटुंबियांना त्याला  भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशा सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. यापूर्वीही राज्यपालांनी अनिल देशमुख यांच्याकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.

अर्णबच्या जमीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने आरोपींना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यामुळं या प्रकरणावर आज (सोमवारी) निर्णय सुनावणार असल्याचं जाहीर केलं आहे. न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचे खंडपीठ विशेष व्हीसी सुनावणीत निकाल सुनावणार आहेत.

Post a comment

0 Comments