कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी विष्णुभाऊ जेजुरकर


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :

वैजापूर  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप सभापती पदी शिवसेनेचे विष्णुभाऊ जेजुरकर याची बिनविरोध निवड झाली आहे.
या वेळी आमदार रमेश बोरनारे,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे अजय चिकटगावकर, सभापती भागीनाथ दादा मगर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे कार्याध्यक्ष उत्तम निकम, रिखबचंद पाटणी,  आदीसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 
बाजार समितीच्या उपसभापती  पदाच्या   निवडणुकी करीता अध्यासी अधिकारी विनय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत उपसभापती पदाकरीता  विष्णु भाऊ जेजुरकर याचीं बिनविरोध निवड झाली. या निवडणुकी करीता सहाय्यक म्हणुन  सचिव व्ही. डी. सिनगर यांनी काम पाहिले.
यावेळी माजी बाजार समितीचे संचालक संजय पाटील निकम, काकासाहेब पाटील , ज्ञानेश्वर पा जगताप, रामहरी  जाधव,  संतोष पाटील गायके , राजेंद्र चव्हाण,   रिखबचंद पाटणी, रावसाहेब जगताप, , दिगंबर  खंडागळे, राजेंद्र कराळे, सुरेश तांबे, कैलासचंद बोहरा, बाबासाहेब (बद्री) गायकवाड,सुरेश अल्हाट,  माया आव्हाळे, मिरा मतसागर, आदींची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments