पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

 
औरंगाबाद, दि. 30 सोमवार : महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दिनांक 01 डिसेंबर , 2020 मंगळवार रोजी होणाऱ्या 05 - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमितिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असेही ते म्हणाले.
भारत निवडणूक आयोग यांचे दिनांक 02 नोव्हेंबर , 2020 रोजीचे प्रसिध्दी पत्रकानुसार 05 - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक -2020 निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 01 डिसेंबर , 2020 (मंगळवार) रोजी सकाळी 08.00 ते सायंकाळी 05.00 पर्यंत होणार आहे. महाराष्ट्र शासन , सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणेबाबत निर्देश दिलेले आहेत, असेही त्यांनी कळवले आहे.
*****

Post a comment

0 Comments