गोस्वामींच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात इतक्या तातडीने सुनावणी होतेच कशी? सुनावणीअभावी कित्येकजण तुरुंगात खितपत, इतरांना मिळत नाही अनेक महिने सुनावणीची तारीख.

सुनावणीअभावी कित्येकजण तुरुंगात खितपत, इतरांना मिळत नाही अनेक महिने सुनावणीची तारीख.

नवी दिल्ली : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना लगेचच कशी सुनावणी मिळते. अर्णव गोस्वामी यांच्यावर इतकी मेहरबानी का, असा सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला आहे.

दुष्यंत दवे यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सचिवांना पत्र पाठवले आहे. याचिकांचा क्रम ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात काही नियमच नाही. अर्णव गोस्वामी यांच्या जामिनाच्या याचिकेवर इतक्या तातडीने सुनावणी घेतली जाते. मात्र, कित्येकजण सुनावणीअभावी तुरुंगात खितपत पडले आहेत. 

इतरांना अनेक महिने सुनावणीची तारीख मिळत नाही. मग अर्णव यांनाच दरवेळी लगेच कशी तारीख मिळते, असा परखड सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णव गोस्वामी यांना अंतरिम जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे. 
उच्च न्यायालय अनेकदा व्यक्तीस्वातंत्र्याची बाजू घेत नाही. आत्महत्या प्रकरणाचा जरुर तपास व्हावा. त्यामुळे राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करत असेल तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असे मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

Post a comment

0 Comments