आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी चे भूमीपुजन आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे यांच्या हस्ते पार पडले.


 नांदेड,दि. १८ बुधवार :  आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी चे भूमिपूजन  लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व आशा फार्मसच्या चेअरमन व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे सह जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पा. शिंदे, सुरज ग्रुपचे चेअरमन रमेश सावकार पारसेवार ,खरेदी-विक्री संघाचे चेअरमन स्वप्नील पाटील उमरेकर, जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील,जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे,कंधार कृ. उ. बा. समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चौडे, श्याम आण्णा पवार,नगरसेवक जीवन चव्हाण,हर्षद शहा ,गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष सूरर्जीत सिंह कामठेकर, युवा नेते रोहित पाटील शिंदे ,प्रगतिशील शेतकरी गोपाळ पाटील इजळीकर उपस्थित होते यावेळी  आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्या शेतीचा विकास करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी लावणार असल्याचे आशा फार्मसच्या चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी उपस्थितांना बोलताना  केले, यावेळी  कंधार मतदार संघातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी बांधव सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील नंदनवनकर यांनी केले.

Post a comment

0 Comments