बिहारमध्ये ९४जागांवर मतदान, इव्हीएमस खराब असल्याने अनेक ठिकाणी मतदानास उशीर, तर १० राज्यांमध्येही ५४ जागी पोटनिवडणूक.

बिहार:-  निवडणुका सुरू आहेत तर तीन टप्प्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील ९४ जागांवरील मतदान सुरू आहे. ५ जिल्ह्यांच्या अनेक बूथमध्ये EVM खराब असल्याने मतदानास उशीर झाला आहे. ११ वाजेपर्यंत १९.२६% मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ५५.९% मदतान झाले होते. तिसऱ्या टप्प्याची वोटिंग ७ नोव्हेंबरला होईल. निवडणुकांचे निकाल १० नोव्हेंबरला लागणार आहेत.
१० राज्यांत ५२ जागांवरील पोटनिवडणुकाही मंगळवारी होत आहेत. यात सर्वाधिक मध्य प्रदेशातील २८ जागांवर मतदान होत आहे. गुजरातेत ८, उत्तर प्रदेशात ७, कर्नाटक, ओडिशा, झारखंड व नागालँडमध्ये प्रत्येकी दोन, तर तेलंगण, छत्तीसगड व हरियाणात प्रत्येकी एका मतदारसंघात मंगळवारी मतदान होत आहे.
कोरोनामुळे निवडणूक आयोगाने वोटिंगचा कालावधी एक तास वाढवला आहे. ९४ मधून ८६ जागांवर सकाळी ७ तेस संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. इतर ८ जागांवर सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत मतदान होईल. यामध्ये तेजस्वी यादव यांची राघोपूर सीटचाही समावेश आहे.
ज्या ९४ जागांवर मतदान होत आहे. २०१५ मध्ये त्यामध्ये ५० जागा जदयू आणि भाजपाने जिंकल्या होत्या. ३३ जागा राजदला मिळाल्या होत्या. पार्टीच्या हिशोबाने पाहिले तर २०१५ मध्ये सर्वात जास्त ३३ जागा राजदला, ३० जागा जदयूला आणि २० जागा भाजपला मिळाल्या होत्या.

Post a comment

0 Comments