शेअर बाजाराला मोठी चालना

नवी दिल्ली : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगवारीही घरेलू शेअर बाजाराला नवीन उच्चांकासह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स  ३६१.८२ अंकांच्या वाढीसह ४२,९५९.२५ च्या उच्चांकावर उघडला. याचबरोबर निफ्टीने  पहिल्यांदाच १२,५०० पार केले आहेत. अमेरिकन निवडणुकीत  जो बियाडन यांचा विजय  आणि कोरोना लसीविषयी  होणाऱ्या दाव्यांमुळे शेअर बाजाराला मोठी चालना मिळाली आहे. सलग सातव्या दिवशी शेअर बाजारात  तेजी दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांनी ८.८० लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

९० टक्क्यांहून अधिक कोरोना लसीचा प्रभाव
अमेरिकन औषधनिर्माण कंपनी  आणि जर्मन बायोटेक कंपनी यांनी दावा केल्यानुसार, कोरोनाचा नाश करण्यासाठी त्यांनी तयार केलेली लस ही लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. या दाव्याचा परिणाम जागतिक बाजारातही दिसून आला.

Post a comment

0 Comments