लवकरच बैठकीच्या माध्यमातून रस्त्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू- खासदार डॉ भागवत कराड.


 वैजापूर - वैजापुर तालुक्यातील रस्त्यांच्यी दयनीय अवस्थे च्या विरोधात गेल्या 22 दिवसापासून वैजापूर तालुक्यातील झालेली रस्त्याची दुर्दशा लक्ष्यात घेत तालुक्यातील नागरिकांनी तालुका कृती समिती स्थापन करून या मार्फत तालुक्यातील कोणते रस्ते चांगले आहे म्हणत योग्य तो निर्णय घेऊन रस्ते दुरुस्ती ताबडतोब करण्यात यावी म्हणून साखळी आंदोलन सुरू केले आहे. 

आज 22 व्या दिवशी खासदार डॉ भागवत कराड, भाजपा जे जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी, एकनाथ जाधव, तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे, प्रशांत कंगले, तसेच भाजपचे इतर पदाधिकारी यांनी कृती समितीस भेट देऊन पाठिंबा जाहीर करत येत्या दोन दिवसात जिल्हयाच्या ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी खासदार भागवत कराड बोलताना म्हणाले की वैजापूर तालुक्यातील सर्वच विभागातील रस्त्याची वाईट अवस्था झाली असुन  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,  सार्वजनिक बांधकाम विभाग व कृती समिती यांची दोन दिवसात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. 
यावेळी खासदार डॉ भागवत कराड,जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, जिल्हा सरचिटणिस डॉ दिनेश परदेशी लक्ष्मण औटी, भावराव मुळे, बापु घडामोडे, एकनाथ जाधव, कल्याण दांगोडे,प्रशांत कंगले, अनिल वाणी, गौरव दौडे, महेश भालेराव,संतोष मिसाळ, गणेश खैरे, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments