पंतप्रधान मोदींचे स्वागत करणार का? संजय राऊतांनी दिले उत्तर

मुंबई:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तसेच कंगना राणौतला नुकसानभरपाई देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. सकाळीच राऊत यांनी सीबीआय आणि ईडीवर एक कार्टून पोस्ट करत, खळबळ उडवून दिली होती. 
संघर्ष करण्याचा महाराष्ट्र, प. बंगालचा स्वभाव. संघर्ष करत राहणार. राज्यात सत्तापरिवर्तन करण्याची त्यांची इच्छा आहे, आमची शुभेच्छा. आम्हाला शुद्ध राजकारण करायचे आहे. जे कारटून मी शेअर केले ती लोकांची भावना आहे. दबावाचं राजकारण करायचे तर करा. आम्ही संयमाने या गोष्टी घेत आहोत, आणि मजाही लुटत आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले. 
व्यंग ज्यांना समजले ते त्या पद्धतीने घेतील. ज्यांना नाही समजले ते आणखी सूडबुद्धीने वागतील. ज्या लोकांना विकृत आनंद घ्यायचा आहे ते घेतील. सगळे विकत घ्यायचे, गुलाम तयार करायचे ही ईस्ट इंडिया कंपनीची परंपरा होती. विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम. विधायक पद्धतीने तो व्हाय़ला हवा, अशी अपेक्षा राऊत यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीला व्यक्त केली.  
तसेच पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत आहेत. पुण्यात नेहमीच सर्वांचे स्वागत. महाराष्ट्राने राष्ट्रीय नेत्यांचे खुल्यादिलाने स्वागत केले आहे. मोदी पंतप्रधान असून त्यांचे स्वागत करणे आमचे कर्तव्य आहे, असेही राऊत म्हणाले. 

Post a comment

0 Comments