पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद, हैदराबादनंतर आता पुण्यातील 'सिरम' इन्स्टिटयूटमध्ये दाखल 

पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला पोहोचले आहेत. सकाळी 12:30 ला हा दौरा आयोजिला होता मात्र भारतामध्ये अहमदाबाद इथल्या झायडस बायोटेक पार्क, हैदराबाद इथल्या भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट असा हा आजचा एकूण दौरा आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सायंकाळी 4:45 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे. 'सिरम'कडे सध्या जगाचं लक्ष लागून आहे. कारण लस उत्पादनाची जगातील सर्वात मोठी क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीचं उत्पादन करण्याचे हक्क सीरम इन्स्टिट्यूटनं मिळवले आहेत. या लसीच्या चाचण्यांचे विविध टप्पे जाणून घेण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दौरा करत आहेत. खूप कमी वेळेसाठी म्हणजेच तासाभराचा हा दौरा आहे. 
जगभराचं कोरोना लस उत्पादन सीरम मध्ये होऊ शकतं. त्यामुळेही पुण्यातलं  सीरम इन्स्टिट्यूट आणि आजचा पंतप्रधान यांचा सीरम दौरा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

Post a comment

0 Comments