राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय लागली: गोपीचंद पडळकर

सांगली :-  काँग्रेस, राष्ट्रवादीच हे भ्रष्टाचारी टग्याचं सरकार असून, दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली आहे, अशी टीका ही भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जर लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदर निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायच ? तुम्ही मोदिंच्यावर टीका करतात, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर मग इतका त्रागा का करता, असा संतप्त सवाल, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. सांगली मध्ये प्रसारमाध्यमाशी बोलत होते.काँग्रेस, राष्ट्रवादीच हे भ्रष्टाचारी टग्याचं सरकार असून, दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली आहे, अशी टीका ही भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

Post a comment

0 Comments